साठवण
आपल्या समोर असे काही छोटे प्रसंग घडतात किंवा घडत असतात ... की कायम आठवणींमध्ये राहतात आपोआप... त्यातून खूप काही साठवण होते की जी जेंव्हा जेंव्हा आठवू तेंव्हा अधिकाधिक आनंद च देते
.... मला आठवतय माझी आज्जी ताक घुसळायला घ्यायची तेंव्हा नेमक्या मला श्रीकृष्णाच्या लोण्याच्या गोष्टी दुधाच्या घागरी वगैरे आठवायच्या आणि लोणी काढायच्या वेळेला मी तिथे ठाणच मांडायची आणि शिरस्त्याप्रमाणे लोण्याचा गोळा हातावर मिळायचा
आज्जी म्हणायची कृष्णच आहे... पण अजून हवय म्हणले की ती सांगायची अग सगळे लोणी आजच संपवलं तर तूप कस कढवणार ... ते पण हवं ना
माझ्या मनात आपला विचार... आज्जी टीव्ही बघत नाही का फ्रेश आणि हेल्दी तूप विकत आणायचं ना सोप्पंय... पण हा विचार मनातच ठेऊन शहाण्या सारखी ऐकायची मी...
त्यावेळी वाटायचं आपल्याला हे ताक करायला मिळेल तेंव्हा यथेच्छ ताव मारायचा तुपा बिपाची काळजी करायची नाही
काही वर्षांनी लग्न झालं आणि सासरी पण आजेसासूबाईंना ताक करताना बघून लहानपणीचा गमतीचा विचार आल्याशिवाय राहिला नाही
हे ताक करण्याचे काम ह्या आज्याच कसे काय करतात बुवा असो त्याहीवेळी पणतिच्या हातावर कौतुकाने लोणी दिल जायचं ( मी आपले विचार आणि हात आवरता घ्यायची)
मग काही वर्षांनी हे खास ठेवणीतले काम सासूबाई आणि नंतर माझ्याकडे आले ... घरातल्या हायररकी नुसार सरदार काम माझ्याकडे आल्याचा मला उगाचच जरा आनंद वाटला
... आणि त्याचवेळी आई... लोणी म्हणून लेकीने हात पुढे केला ... आणि मी ही सहजपणे लोणी तिच्या हातावर ठेवले .. तिचा आनंद बघताना मला एकदम दोन्ही आज्या आठवल्या ... भूमिकांचे हस्तांतरण झाले होते स्वतः न घेता आपल्या दुधावरच्या सायीला लोणी देणारे हात आठवले ... आणि कळले की अश्या कित्येक गोष्टींमधून त्या साठवणीचा वसाच देत होत्या
आजची साठवण उद्यासाठी गुंतवणूक ठरून आयुष्यभरासाठी सुखाचा परतावा देईल ...
कधी मन राखून .. कधी भल्यासाठी ते मोडून आपल्याच सुखाची तजवीज त्या करत असतात
स्थैर्या साठी ...नात्यांच्या जपणुकीसाठी ... अखंड सुखाचा परतावा मिळावा म्हणून..
आजच्या भविष्यासाठी आपण करत असलेल्या धावपळीत जरा थांबून आपण त्यांच्याही वाटण्याचा विचार केला तर हा वसा कदाचित आपणही पुढे देऊ शकू ... हो ना
... आरती

No comments:
Post a Comment